आमदार रोहित पवार यांच्यावरील कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निषेध..

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून सूडबुद्धीने होत असलेली कारवाई तात्काळ बंद करण्याची मागणी
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड :- मागील काही दिवसापासून ईडीच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण आमदार रोहित पवार यांच्यावरील होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून सदरील कारवाई ही राजकीय सूटबुद्धीने करीत असल्याचा आरोप केला, ही कारवाई तात्काळ सरकारने थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा तरुण तडफदार नेतृत्व आमदार रोहित पवार हे सातत्याने सामान्य लोकांचे तरुणांचे बेरोजगारी तथा सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्याचे काम करत असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने इडी च्या माध्यमातून सरकार जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत असून सदरील प्रकार लोकशाहीत घातक आहे.असे हुकूमशाहीचे प्रकार शासनाने तात्काळ थांबवावे अन्यता येणाऱ्या काळात या संदर्भात व्यापक जनआंदोलन छेडल्या जाईल व सरकारविरुद्ध सामान्य जनतेमध्ये या हुकूमशाही विरोधात राण उठण्याचे काम आम्ही निश्चित करू त्यामुळे सरकारने ही सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवावी असे निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे….
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील कनवाळे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भास्करराव खंडागळे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष देवानंद पुजारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नदीम खान पठाण रेहमत जहागीरदार तहसील भाई शेख इमरान शेख परवेज सूर्यकांत पंडित सह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित…