शैक्षणिक

अब्दुल मुद्दसिर यांच्या प्रयत्नामुळे अनेकांनी केले शैक्षणीक स्वप्न साकार

विविध सामाजीक संस्थेने तर्फे मिळवून दिले एक कोटी रुपये

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

पुसद: पुसद येथील स्टूडन्टस इस्लामीक ऑर्गनाईझेशन ऑफ इंडियाचे सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ता यांनी एक कोटी रुपयाच्या वर विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कॉलरशिप मिळवून दिली या मुळे अनेकांची शेक्षणीक स्वप्ने साकार झाली बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बाबत जागरुकता नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते आणि उच्च शिक्षणापासून वंचित राहतात पुसद च्या या भूमपित्राने शैक्षणीक व आरोग्य क्षेत्रात्र मोलाची कामगिरी केली बऱ्याच वेळी आर्थिक अडचणी मुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात नेमकी हीच गरज ओळखून विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्था तर्फे स्कॉलरशिप मिळवून देऊन विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले . शेकडो विद्यार्थी आज या आर्थिक मदतने उच्च शिक्षण घेत आहेपुसद शहरातील अनेक विद्यार्थ्यांनाएक कोटी रुपयांपेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळवून देण्यात या सामाजिक कार्यकर्त्याला यश आले आहेविद्यार्थ्याच्या प्रवेशावेळी व परीक्षेच्या वेळी स्वतः जातीने हजर राहून मार्गदर्शन करतातएवढेच नव्हे तर आरोग्य क्षेत्रातही मोलाची आणि महत्त्वाची कामगिरी या कार्यकर्त्यांनी बजावलेली आहे पुसद शहरात रुग्णांची २०० पेक्षा अधिक बायपास सर्जरी आणि ७० एनजीओ प्लॅस्टि पूर्णपणे मोफत करून आणली JEE आणि NEET सारख्या परीक्षेला मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळवून दिले आणि आज हे सतत काम सुरू आहे विद्यार्थ्यांना व रुग्णांना मदतीचे काम फक्त पुसद शहरा पुरतेच मर्यादित नसून यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचे कार्य आहेत उमरखेड शहर व तालुक्यात देखील त्यांनी अनेक रुग्णांची मदत करून व त्यांना योग्य मार्गदर्शन करून शासनातर्फे आर्थिक मदत मिळवून दिले .या मार्गदर्शनाने अनेक गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत आहे व रुग्णांना योग्य तो उपचार मिळून आर्थिक मदत होत असल्याने या सामाजिक कार्यकर्त्याची महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी व पुसद शहराच्या ुढार्‍यांनी शासन दरबारीप्रयत्न करून या कार्यकर्तास सन्मानाने पुरस्कृत करावे अशी पुसद शहराच्या सर्व सामान्य जनते तर्फे मागणी होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!