सामाजिक
प्रभू श्री राम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न…!!!

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
अयोध्येत सुरु असलेल्या श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून सोमवार दि. 22 जानेवारी रोजी उमरखेड शहरातील स्टेट बँक कॉलोनी भागात
प्रभू श्री राम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा शेकडो भक्त्यांच्या उपस्थितीत मोट्या थाटात पार पडला. या निमित्ताने शहरात अनेक वर्षापासून स्थित असलेल्या या मंदिराला नवचैतन्य देण्याचे काम करण्यात आले. स्थानिक भक्तांच्या प्रतिक्रिये नुसार सदरील मंदिरास उत्तम वास्तूकला म्हणून पाहण्यात येत आहे. सदरील मंदिराचे काम उमरखेड शहरातील तरुण अभियंता शुभम विलास चव्हाण यांच्या समर्थ कन्स्ट्रकशन या बांधकाम क्षेत्रातील अग्रॅगण्य कंपनीच्या माध्यमातून पार पडले.