सामाजिक

नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दि. 23 जानेवारी रोजी येथील सिंहगड (उबाठा) शिवसेना कार्यालया समोर मातोश्री बहुउद्देशीय संस्था तर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना साडीचोळी व अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तालुक्यातील 25 शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना साडीचोळी व येथील वैद्यनाथ अपंग निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपासह शहरात विविध ठिकाणी 100 झाडांचे लावून वृक्षरोपण आबां, आवळा, सीसम, चिंच, लिंब, बेल इतर झाडाचे स्वामी समर्थ मंदीर, राम मंदीर, ओपन परिसरात करण्यात आले परिसरातील विदयार्थी नागरीकांना खिचडीचे वाटप करण्यात आले तसेच या प्रसंगी मातोश्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव मारोतराव चौधरी, प्राचार्य मोहन मोरे, अनिल नरवाडे, प्रशांत पत्तेवार, अरविंद भोयर, कैलास कदम, रमेश चव्हाण, बंटी गिरी, नागेश गोरेवाड , अजय नरवाडे, रेखा भरणे, रेखा गवळे, डी बी शिंगणकर, नितीन शिंदे, बंडू भुते, नरेश पवार, गोपीचंद दोडके, अनिल कदम, रमेश चव्हाण भंडारे सर विजू रेघाटे डॉक्टर दीपक ठाकरे विजय रेघाटे पत्रकार लक्ष्मीकांत नंदनवार वीरेंद्र खंदारे व शिवसैनिक महिला भगिनी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!