बेलगव्हाणच्या घाटात ऑटोचा भीषण अपघात,दोन जागीच ठार तर दोन उपचारादरम्यान ठार अनेक जण गंभीर जखमी!

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धुंदी लगतच्या बेलगव्हाण घाटात आज दि.१६ जानेवारीच्या सकाळी ११ च्या दरम्यान धुंदी येथील ऑटो क्रमांक एम.एच. २९ ३१७२ मोहा,शिवनगर,धूंदी येथील भाविक नवसा करीता पोहारादेवी येथे जात होते , यावेळी अचानक ऑटो चालकाची वाहनावरील नियंत्रण सुटले व सदरील ऑटो हा रस्त्यावरील खड्ड्यात जाऊन कोसळला ,या दुर्घटनेत जाग्यावर दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमींचा दिग्रस येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमींना दाखल केले

असून यामध्ये बालकांसह आठ दहा लोकांचा समावेश आहे ,सदरील अपघात भीषण होता घटनास्थळी एकच हल्ला कल्लोळ उडाला होता पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात दोन मृतांची मृतदेह पोस्टमार्टम करिता दाखल केली आहेत घटनास्थळी ग्रामीण पोलीस व वाहतूक शाखेचे पोलीस त्वरित दाखल झाले. मयत ज्योतीबाई नागा चव्हाण वय ६० रा. धूंदी , वसराम चव्हाण ६० रा. धानोरा, पार्वतीबाई रमेश जाधव ५० रा.धूंदी, उषा विष्णू राठोड रा धुंदी यांचा मृत्यू झाला तर अपघातातील गंभीर रुग्णांवर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.