Uncategorized

ऑटो पलटी झाल्याने भीषण अपघात ६ जण ठार

पुसद दिग्रस रोडवरील दुर्दैवी घटना

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

पुसद – पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हान घाटात एक ॲपे पलटी झाल्याने भीषण अपघात झाला सदर अपघातात 4जण जागीच ठार झाले असून दोघांचा उपचरादरम्यान मृत्यू झाला आहे इतर सर्व प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुसदच्या मेडिकेअर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

प्राप्त महितीनुसार आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक ऑटो क्रमांक एम एच २९ ३१७२ या मध्ये धुंदी, वसंतपुर, धानोरा गावातील ११ ते १२ जण नवस करण्यासाठी l पोहरादेवी जवळील उमरी येथे जात असताना अचानक पुसद दिग्रस रोडवरील बापूजी अणे स्मारकाजवळ सदर ऐपे ऑटो पलटी झाला. यामध्ये पार्वती बाई रमेश जाधव वय 52 वर्ष राहणार वसंतपूर, ज्योतीबाई नागा चव्हाण वय ५० वर्ष राहणार धुंदी, उषा विष्णू राठोड वय 45 वर्ष राहणार धुंदी, लीलाबाई वसराम चव्हाण राहणार सिंगरवाडी, गणेश वसराम चव्हाण वय 62 वर्ष राहणार

जवाहर नगर, सावित्रीबाई गणेश राठोड वय 40 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चालक ज्ञानेश्वर गणेश राठोड व इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे. मृतकांना शविच्छेदना करिता शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार इंद्रनील नाईक व आमदार निलय नाईक यांनी रुग्णालय


रुग्णालयात येऊन जखमी अपघात झालेल्या रुग्ण व नातेवाईकांशी विचारपूस करण्यात आली. मेडिकेअर रुग्णालयाचे संचालक डॉ. सतीश चीद्दरवार यांच्याशी चर्चा करण्यात आली तसेच अत्यंत गंभीर असलेल्या दोन लहान बालकांना तात्काळ नांदेड येथे हलविण्यात आले.
यावेळी रुपेश गहुलीकर, धीरज ठाकूर, विवेक राठोड इत्यादीं उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!