उमरखेड ; स्थानिक नागरिकांचे टोल नाक्यावरील कर तात्काळ बंद करा

बिजोरा टोल प्लाजा व्यवस्थापकांना मनसेचे निवेदन
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- मागील काही दिवसांपासून नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगव्हाण गावाजवळ बिजोरा टोल प्लाजा सुरू करण्यात आले आहे . सदर टोल नाक्यावरून उमरखेड शहर हे 15 किलोमीटरच्या अंतरावर असून येथील वाहन धारकांकडून टोल नाक्यावर कर घेण्यात येत असून उमरखेड येथील स्थानिक वाहन चालकांपासून टोल वसुली आकारू नये करिता दि 9 रोजी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व्यवस्थापक बिजोरा टोल प्लाजा नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन देण्यात आले आहे .
स्थानिक वाहन चालकांकडून टोल प्लाजावर टोल वसुली करू नये असे आशयाचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी यांना निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले होते तरीपण टोल प्लाजा व्यवस्थापक यांनी स्थानिक उमरखेड वाशियांकडून टोल आकारात असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दिनांक 9 रोजी टोल प्लाजा व्यवस्थापक यांना निवेदन देऊन मनसे स्टाईलमध्ये समजण्यात आले असल्याचे मनसे शहर अध्यक्ष संजय बिजोरे पाटील यांनी सांगितले आहे .
राष्ट्रीय महामार्ग नियमानसार 60 किलोमीटरच्या प्रवाशानंतर नागरिकांना टोल नाका भरणे बंधनकारक असतो परंतु प्रवास ठिकाणापासून 20 किलोमीटर च्या आतील वाहनधारकांना टोल नाका घेण्याचा अधिकार नसल्याचे निवेदनातून म्हटले आहे . स्थानिक नागरिकांचा ओळखपत्र तपासणी करून प्रशासनाने टोल माफीची सवलती दिली पाहिजे परंतु सध्या नांदगव्हाण येथील नवीन टोल नाक्यावर उमरखेड वासियांकडून अतिरिक्त तोल वसुली होत असून ती टोल वसुली प्रशासनाने त्वरित थांबवावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले आहे .
उमरखेड ते नांदगव्हाण टोल नाक्यावरून दररोज शेकडो वाहने दिवसातून दहा ते पंधरा वेळा ये -जा करीत असतात प्रत्येक वेळेस नागरिकांना अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना सदर टोल नाक्यावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे . यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संजय बिजोरे पाटील, संदीप कोकाटे ,अमोल लामटिळे, संजय कदम , वैभव फटाले ,सागर धकाते ,सुनील भांडवले, लक्ष्मण वांगे , गजानन लांडगे, सैय्यद हमीद, राम कदम, सलीम खान उस्मान खान, शे बबलु शे सखाउल्हा , शे इम्रान शे महेमुब , शे बबलु शे लाल सह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



