भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार जाहीर

( कृषी सोबत पुरक व्यवसायासह प्रसार – प्रचार करणाऱ्या राज्यातील १९ जणांना पुरस्कार )
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : – सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड तर्फे दरवर्षी कृषी शास्त्रज्ञ शेतकरी कृषी उद्योजक प्रसारमाध्यमे व कृषी विद्यार्थी यांच्यात संवाद होऊन आधुनिक शेती व प्रगतशील शेतीतील आव्हाने स्वीकारून कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्यांसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार यावर्षी दि.14 जानेवारी 2024 रोजी दुपारी १२ वाजता कृषी महाविद्यालय येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात देण्यात येणार आहेत .
विदर्भातील शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्येला उपाय म्हणून शेती संबंधित सर्व अडचणीवर मात करीत शून्यातून विश्व निर्माण करणारे व स्वकर्तृत्वावर स्वतःचे आर्थिक नियोजन करून इतरांनाही आपल्या सोबत कार्यास प्रवृत्त करणारे , स्वतः सोबतच आपण समाजाचे सुद्धा हित साधू शकतो ही भावना जपणारे कष्टकरी , संशोधक शोधून त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सामान्यातील सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व त्यातून मार्गदर्शन घेऊन इतरही शेतकरी बांधवांनी त्यांच्यासारखी शेती विषयक कार्यात भरारी घेऊन , सोबतच शेतीला पूरक व्यवसाय जोडून परंपरागत शेती व्यवसायासोबतच दुग्ध उत्पादन , शेळीपालन , कुक्कुट पालन व इतरही असे अनेक पूरक व्यवसाय शेतीला जोडले तर नक्कीच त्या शेतकऱ्यांची उन्नती व भरभराट होईल . शेतीला पूरक व्यवसाय कसे जोडावेत व अनेक अडचणींना समोर जात त्यातून मार्ग कसा काढावा या व अशा अनेक विषयावर या सोहळ्यात उपस्थित पुरस्कार प्राप्त शेतकरी आपले अनुभव शेतकऱ्यांना कथन करतील त्यांनी सांगितलेल्या अनुभवातून आपल्या परिसरातील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विज्ञान मंचच्या माध्यमातून भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान हा उपक्रम 2006 पासून राबवीत आहेत
प्रत्येक घटक आणि सलग्नित कृषी महाविद्यालयामध्ये कृषी विज्ञान मंच या उपक्रमांतर्गत शेतकरी उपयोगी कार्य करण्यात नियोजित केले होते त्या अनुषंगाने कृषी क्षेत्रात सर्वात आधी शेती , सर्वात कमी खर्चाची शेती व दररोज पैसा देणाऱ्या पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड व डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न कृषी विज्ञान मंच कृषी महाविद्यालय उमरखेड यांचे उपक्रमाद्वारे गेल्या 30 वर्षापासून दिल्या जाणाऱ्या भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराची घोषणा डॉक्टर विजयराव माने मार्गदर्शक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष – शेतीमित्र अशोकराव वानखेडे व उपाध्यक्ष डॉक्टर गणेश जाधव आणि इतर निमंत्रित कृषी शास्त्रज्ञ व अधिकारी यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दररोज पैसा प्राप्त करणारे शेतकरी व इतर मान्यवरांची खालील प्रमाणे गटनिहाय निवड करून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत याबाबतचे प्रसिद्धी पत्र प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब ओझलवार यांचे कडून जाहीर करण्यात आले आहे .
चौकट
सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान तर्फे पूरक उद्योग युवा महिला पुरस्कार – प्रियंका शिवराज फाटे जि . बीड ,
रेशीम उद्योग – प्रकाश बालाजी काळे धानोरा (सा ) ता.उमरखेड ,
तज्ञ रेशीम उद्योग – सखाहरी उर्फ नानासाहेब कचरू जाधव कृष्णनगर ता इगतपुरी जि. नाशिक
कृषी विस्तार – कुंदन भाऊसिंग चव्हाण यवतमाळ
भाजीपाला उत्पादक – अनिल शिवलाल किरणापुरे लवारी ( उमरी ) ता . साकोली जि . भंडारा
एकात्मिक शेती व्यवस्थापन – मल्हार प्रल्हाद कुंभार चोरवड ता.पारोळा जि. जळगाव
उत्कृष्ट वृत्त प्रसारण – निलेश अण्णाजी फाळके राळेगाव यवतमाळ (दूरचित्रवाणी एबीपी माझा )
उत्कृष्ट वृत्तलेखन – अविनाश पांडुरंग साबापुरे उपसंपादक लोकमत यवतमाळ वृक्ष संवर्धन – मोक्षधाम समिती द्वारा ग्रामपंचायत सुकळी (ज )उमरखेड जि यवतमाळ
दूध उत्पादक – राहुल नारायण निनावे आर्णि जि . यवतमाळ
कृषी शास्त्रज्ञ – डॉ संजय उत्तमराव काकडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
दैनिक कृषी वृत्त लिखाण – श्रीकृष्ण महादेवराव जावळकर आर्णि जि . यवतमाळ (दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधी ) कृषी विस्तार व संशोधन – डॉ उज्वल अजाबराव राऊत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
कर्तृत्ववान महिला शेतकरी – कु सुशीला दशरथ बिडकर व कु बेबी दशरथ बिडकर पुसला ता वरुड जि अमरावती जलसंवर्धन – हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे नागरवाडी ता लोहा जि नांदेड
फुल शेती हायटेक नर्सरी – सौ हिराबाई किसनराव शेटे नारायणगाव ता जुन्नर जि पुणे
उत्कृष्ट कृषी प्रसारण – शिवानी रमेश वानखेडे यवतमाळ (आकाशवाणी ) तांत्रिक शेती व हळद उत्पादक – नौशाद खान सरदार अन्वर खान पठाण वाई (सावर ) जि . यवतमाळ
दूध उत्पादन धवल क्रांती – उमरखेड दूध शीतकरण केंद्र कृष्णापुर फाटा ढाणकी या सर्व पुरस्कार प्राप्त कर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे . कृषी गौरव पुरस्कार सोहळा दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी १२ वाजता कृषी महाविद्यालय उमरखेड येथे संपन्न होईल असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेती मित्र अशोक वानखेडे यांनी कळविले आहे .