डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय उमरखेड येथील कृषीकन्या

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
कु. भाविका मसराम, , रश्मी सोरते, ऋतुजा चव्हाण, आयेशा खानम, साक्षी डुकरे , ऋतुजा गवळी यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उमरखेड येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया कशी व कोणत्या पिकास करावी, सोयबीन, कापूस, मका इत्यादी पिक उत्पादन वाढीस पेरणी पूर्व बिजप्रक्रीया फायदेशीर असते उगवणशक्ती वाढते व किटकांपासून संरक्षण करते अशाप्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात झाले. बियानांवर रायझोबियम ट्रायकोडर्मा व जिब्रेलिक एसिडची बिजप्रकिया केली व पेरणीपूर्व बिजप्रक्रीयेची प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. पेरणीपूर्व बिजप्रक्रीया प्रात्यक्षिकास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंतले सर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख तसेच तुर, विषयतज्ञ वाय. एस. वाकोडे सर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी गावाच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदविली.