मुळावा येथील सतर्क तरुणांनी पकडला अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर

महसूल प्रशासन रेती तस्करांच्या ताटाखालचे मांजर….?
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
मुळावा परिसरात रेती माफिया यांचा हौदोस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. पैनगंगा नदीपात्रातून हातला, नांदला या रेती घाटावरून रोज रात्री 30 ते 40 ब्रास रेती चोरून हे रेती चोर दहा ते बारा हजार रुपये ट्रिप ने रेती विकत होते.रोज रात्री रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे मुळावा येथील नागरिक त्रस्त झाले होते.तसेच अति वेगाने जाणाऱ्या या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली होती.महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू असताना वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरत होते,
त्यामुळे मुळावा येथील सतर्क तरुणांनी सोमवारी रात्री अवैध रेती चोरून नेणारे एक ट्रॅक्टर पकडून तहसीलदार यांच्या हवाली केले,
हातला,नांदला या रेती घाटावरून रोज रात्री काही रेती तस्कर रेतीची चोरी करून मुळावा तसेच इतर गावात रेती विकत होते.
काही सतर्क तरुणांनी स्थानिक पातळीवर गावातील तरुण अवैध रेती चोरी पकडत असतील तर महसूल प्रशासन झोपा घेत आहे की काय…?हा प्रश्न उपस्थित होते.
चौकाट-:गेल्या अनेक दिवसांपासून हातला,नांदला रेती घाटावरून होत असलेली रेती बाबत नमो महाराष्ट्र या वृत्तपत्रा मधून अनेक बातम्या प्रकाशित केल्या होत्या, तरी सुद्धा महसूल प्रशासन कुंभकर्ण झोपेत होते,पण मुळावा येथील तरुणांनी अवैध रेती चोरून नेणारा ट्रक्टर पकडून उमरखेड तहसीलदार यांच्या हवाली केला.गावातील तरुण जर रेती चोरी पकडत असतील तर महसूल कर्मचारी करतात तरी काय…?मुळावा साजा चे तलाठी पंजाब सानप ,मंडळ अधिकारी झोपा घेत आहेत की काय..?हा प्रश्न उपस्थित होतो.
चौकट-:गेल्या अनेक दिवसांपासून हे रेती तस्कर रेती चोरी करून विकत होते,त्यामुळे हातला,नांदला घाटावरून आतापर्यंत चोरून नेलेल्या रेतीचे घाटावर जाऊन मोजमाप करून रेतीतस्करांना दंड आकारण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
