Uncategorized

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढीच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा

(कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा धडक मोर्चा)

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ (दि. 19 डिसेंबर) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कामगारांना पगारवाढ मिळावी, एप्रिल २०१६ पासून वेतनवाढ व घरभाडेभत्तावाढीच्या फरकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी, महागाई भत्ता वाढीच्या फरकाची मागील चार वर्षांपासून थकीत रक्कम एकरकमी देण्यात यावी, मागासवर्गीयांचा भरती, बढतीतील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, शिस्त व आवेदन कार्यपद्धतीत बदल करण्यात यावा, आदी विविध प्रकारच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मंगळवारी दि १९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वा धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने सातत्याने शासन, प्रशासनाशी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी यापूर्वीही अनेकदा आंदोलनाच्या नोटीस देण्यात आल्या होत्या गतवर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर सुद्धा मोर्चा काढण्यात आला होता दि ९ व १० औगस्ट २०२३ रोजी आझाद मैदानावर दोन दिवस उपोषण आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी मा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत चर्चा झाली होती मात्र अद्यापही शासनाने एस टी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व एस टी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने हा धडक मोर्चा नागपूर येथे आयोजित केला आहे.

संघटनेचे अध्यक्ष मा धर्मपाल ताकसांडे यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या मोर्चात संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे, कार्याध्यक्ष विजय नंदागवळी, वरिष्ठ उपाध्यक्ष वाल्मिक येलेकर, कोषाध्यक्ष रविंद्र मांडवे, नागपूर प्रादेशिक सचिव उदय मालाधारी, अमरावती प्रादेशिक अध्यक्ष जीवन जाधव,सचिव राजेंद्र माहूरे, छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद प्रादेशिक अध्यक्ष संदीप खंडागळे,सचिव बी एस खंडारे, पुणे प्रादेशिक अध्यक्ष जनार्दन लोंढे, सचिव मिलिंद रणपिसे,नाशिक प्रादेशिक अध्यक्ष शाम जाधव,सचिव शशिकांत ढेपले, मुंबई प्रादेशिक अध्यक्ष एम जी कांबळे,सचिव गौतम कांबळे, अतिरिक्त सरचिटणीस गणेश कांबळे (नांदेड), अतिरिक्त सरचिटणीस सदानंद कांबळे (मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर) अतिरिक्त सरचिटणीस काशिनाथ सुलाखे पाटील (अहमदनगर) ,यांच्यासह राज्यातील विविध विभागांतील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी नागपूर येथे येत आहेत अशी माहिती संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस विश्वनाथ जाधव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!