माझी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय हे मातृतीर्थच; राम देवसरकर

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
८ डिसेंबर २०२३ रोजी गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा.राम देवसरकर यांनी महाविद्यालय हे माजी विद्यार्थ्यांचे मातृतीर्थच असते. विद्यार्थी हा महाविद्यालयाचा अविभाज्य घटक बनवून राहिला तर नक्कीच दोघात जिव्हाळ्याची नाती निर्माण होईल. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राम देवसरकर तसेच डॉ.सुशीलाताई गावंडे (अमेरिका ) अँड. सुमिताताई गावंडे (अमेरिका )डॉ.यादवराव राऊत सचिव( यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था )यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.लीला भेले (मा.प्राचार्य बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा )श्री. गोविंद वाकडे( पुणे प्रतिनिधी लोकमत )तसेच डॉ. गावंडे अल्मुनी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.अशोक महामुने व महाविद्यालयाचे प्राचार्य माधवराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गावंडे माजी विद्यार्थी स्नेहमिलन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. अशोक महामुने यांनी केले. ट्रस्टची भूमिका प्रा. डॉ.के. डी. बोंपिलवार यांनी मांडली.माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी तन मन धनाने खारुताईचा वाटा उचलावा असे प्रतिपादन डॉ. यादवराव राऊत यांनी केले. प्रमुख वक्त्या डॉ.लीला भेले यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, माझ्यासारख्या लाजऱ्या बुजऱ्या मुलीला बोलण्यास या महाविद्यालयाने शिकवले. महाविद्यालय हे मातृतीर्थच असते. ही भावना जुन्या आठवणींना उजाळा देते. श्री गोविंद वाकडे महाविद्यालय शिक्षकाच्या संस्कारामुळेच मी आज या ठिकाणी आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. श्री.भगवान अग्रवाल, श्री अरविंद धबडगे पाटील, श्री गोविंद वाकडे, श्री रामेश्वर बिचेवार, श्री प्रदीप तीवले, श्री नागेश मिराशे या माजी विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालय जीवनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.वसुंधरा कदम यांनी व आभार प्रदर्शन, प्रा.डॉ. के.डी. बोंपिलवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डी.एस. शिंदे, प्रा.एन. डी.ठाकरे, प्रा. व्ही.बी.कणवाळे, प्रा.एस. पी.चिंचोलकर, प्रा.एस. के. बीचेवार ,प्रा.पी. बी. देशमुख,प्रा. सुभाष होले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला असंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.