शैक्षणिक

उमरखेड येथे बोर्डेक्स मिश्रणावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798386192

उमरखेड: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न असलेल्या स्थानिक उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाच्या सातव्या सत्रात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे शेतकऱ्यांना बोडॅक्स मिश्रणावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विद्यार्थी कु. ऋतुजा चव्हाण, साक्षी डुकरे, रश्मी सोरते, ऋतुजा गवळी, आयेशा खानम, भाविका मसराम यांनी शेतकऱ्यांना बोर्डेक्स मिश्रणाची पद्धत व वापर तसेच कॉपर सल्फेट, चुना, पाणी यासारख्या पदार्थाचे प्रमाण तसेच त्याचे फायदे व ते का करावे याची माहिती दिली.
प्रात्यक्षिकास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंतले सर तसेच विषयतज्ज्ञ मा. एस. एन. अंभोरे सर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख मा. वाय. एम. वाकोडे सर, या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. या साठी गावकऱ्यांची मोठी उपस्थिती नोंदवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!