मनोज जरांगे पाटील यांची आज उमरखेड मध्ये विराट सभा( लाखो मराठा समाज बांधव एकवटणार)

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
मागील कित्येक दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी घेऊन संबंध महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन उमरखेड येथे करण्यात आले असून या सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे या सभेला उपस्थित राहण्यासाठी तब्बल आठ तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव आपली उपस्थिती दर्शविणार आहेत मागील आठ दिवसापासून या सभेचे नियोजन सकल मराठा समाज समन्वयकाकडून करण्यात येत आहे स्थानिक गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयासमोरील भव्य पटांगणात करण्यात आले असून या सभेला लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे येत असून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला येणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून समन्वयकाकडून विविध उपाय योजना आखण्यात आल्या असल्याचे दिसत असून सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांची व्यवस्था तिवडी रोडवरील शिव कमल मंगल कार्यालय बाळदी रोडवरील आयटीआय कॉलेजच्या समोरील खुल्या जागेत पुसद रोड वरून येणाऱ्या वाहनांसाठी जिल्हा परिषद कन्या शाळा जिल्हा परिषद मुलांची शाळा व कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाजात महागाव रोड करून येणाऱ्या वाहनांसाठी नागेश वाडी गावापासून संपूर्ण बायपास रोडवर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांचा उमरखेड शहरातून भव्य रोडशो होणार असून येथील नागचौकात स्थानिक मुस्लिम समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे यानंतर हा रोडशो माहेश्वरी चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती तहसील रोड मार्गे साखळी उपोषण स्थळी ते भेट देणार आहेत महात्मा फुले चौकात हार अर्पण करून हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक चौकातील पुतळ्याला हार अर्पण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबी मशीनच्या साह्याने मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सभास्थळाकडे प्रस्थान करणार आहेत या सभेला जास्तीत जास्त सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या संयोजन समितीकडून करण्यात आले आहे……।।।।( चौकट). तगडा पोलीस बंदोबस्त. ,,,,,, आज होणाऱ्या सभेला तब्बल आठ तालुक्यातील लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तगडा पोलीस बंदोबस्त लावल्याचे दिसून येत आहे



