मौजे आंदेगाव पूर्व येथील अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक..

दारू विक्री करणाऱ्याच्या घरात जाऊन बोटलांची केली तोडफोड….
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख खयुम/
तालुक्यातील मोजे आंदेगाव पूर्व येथे अवैध देशी दारू विक्रीमुळे गावातील तरुणाई व्यसनाधीन होत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आणि नव तरुण युवकांसह महिलांनी आक्रमक आज पवित्रा घेत, अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी व अनेक ग्रामीण भागात ग्रामसभेत ठोस ठराव मंजूर करून देखील तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात आले असून तरी पण ही अवैध दारू बंद होत नसल्यामुळे आज चक्क आंदेगाव येथे दहा मार्च रोजी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्याच्या घरावर धाड टाकून त्यांच्या घरातील दारूच्या बाटल्यांचा खच बाहेर काढून तो फोडत संबंधित दारू विक्री करणाऱ्यांची नावे चावडीवर सांगून ग्रामसभेमध्ये त्यांनी पोलीस प्रशासनाला बोलावत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची विनंती केली या घटनेवरून असे निदर्शनास येते की जे काम पोलीस प्रशासनाला जमले नाही ते काम गावातील ग्रामरक्षक दलाने करून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे या घटनेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे…



