बोरवेल व विहीर खोदकाम संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर; खोदकामावरील बंदी उठवून व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी व बेरोजगारांनी कर्ज काढून बोरवेल मशीन, जेसीबी तसेच विहीर खोदकामाची यंत्रसामग्री खरेदी करून रोजगाराचा मार्ग स्वीकारला. या व्यवसायातून स्वतःसह मजूर वर्गालाही रोजगार मिळत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी बोरवेल व विहीर खोदकामावर बंदीचे आदेश काढल्याने व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
या आदेशाच्या पार्श्वभूमीवर बोरवेल व विहीर खोदकाम संघटनेने 5 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन साद केले. खोदकाम व्यवसायावर अचानक निर्बंध आणल्यामुळे मशीनधारक, चालक, मजूर तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेने निवेदनातून नमूद केले.
दरम्यान, महागाव येथे महसूल अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बोरवेल मशीन जप्त करून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे संघटनेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना रोजगारापासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळत नसल्याने अनेकांनी स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च करून मशीनरी खरेदी केली आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यासोबतच चालक, मजूर आणि इतर कामगारांनाही रोजगार मिळतो. त्यामुळे शासनाने रोजगाराचा विचार करून योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी संघटनेने केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी बोरवेल व विहीर खोदकामावरील बंदीबाबत फेरविचार करून रोजगार करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोरवेल व विहीर खोदकाम संघटनेचे अध्यक्ष भगवान गावंडे यांनी सांगितले की, “रोजगाराच्या उद्देशाने शेतकरी व बेरोजगारांनी कर्ज काढून मशीन घेतल्या आहेत. अचानक व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या कर्जाचा हप्ता आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने रोजगाराचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.”
आता जिल्हाधिकारी प्रशासन या निवेदनावर कोणती भूमिका घेते आणि बोरवेल व विहीर खोदकाम व्यवसायाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संघटनेसह शेतकरी व व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



