Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी तात्काळ कारवाईचे पत्र प्राप्त
वृत्तपत्राच्या दखलीनंतर आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रिय; पाच जिल्ह्यांना कडक निर्देश

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यासह परिसरात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांच्या प्रश्नाची महासागर वृत्तपत्राने दखल घेतल्यानंतर आरोग्य विभागाकडून तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याबाबतचे पत्र संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.
अकोला आरोग्य मंडळांतर्गत अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ यांनी दिले आहेत. संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात वैद्यकीय पात्रता नसताना उपचार करणाऱ्या व्यक्तींमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती.
वृत्तपत्राच्या दखलीनंतर आता आरोग्य विभागाने कारवाईचे पत्र काढल्याने बोगस डॉक्टरांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित यंत्रणेने केवळ कागदोपत्री आदेश न काढता तालुकानिहाय तपासणी मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button