महागाव तालुका गटात नितीन भुतडा यांचे पारडे जड
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भुतडा यांच्या बाजूने कल; एकतर्फी विजयाचे चित्र?

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महागाव तालुका गटातील राजकीय चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. या गटातून मुरब्बी नेते नितीन भुतडा यांच्या बाजूने सहकार क्षेत्रातील मतदारांचा कल असल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे. त्यामुळे भुतडा यांचे पारडे सध्या चांगलेच जड मानले जात आहे.
महागाव तालुका गटातील विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी सुरू असलेला संपर्क, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी यामुळे नितीन भुतडा यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे. अनेक वर्षांचा सहकार क्षेत्रातील अनुभव, विविध संस्थांमधील संपर्क आणि तालुक्यातील राजकीय समीकरणांचा त्यांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीपूर्वी विविध गटांकडून सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे महागाव तालुका गटातील समीकरणे बदलताना दिसत आहेत. सुरुवातीला निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र असताना आता मात्र नितीन भुतडा यांच्या बाजूने वातावरण झुकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, मतदारांच्या भेटीगाठी आणि उपलब्ध राजकीय समीकरणांचा विचार करता भुतडा यांना मिळणारा मुरब्बी नेत्यांचा पाठिंबा वाढत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे महागाव तालुका गटात त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
महागाव तालुका गटातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता नितीन भुतडा यांचा विजय एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत महागावचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भुतडा यांचा मार्ग सुकर झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
मात्र, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची अंतिम भूमिका आणि मतांचा कौल मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होणार असल्याने प्रत्यक्ष निकालासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तरीही महागाव तालुका गटात सध्या नितीन भुतडा यांचे पारडे सर्वाधिक जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



