शहर

हिमायतनगर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; नगरसेविका प्रतिनिधी रमेश पंडित यांच्या आग्रही पाठपुराव्यामुळे नगरध्यक्ष शेख रफिक यांच्या माध्यमातून अख्तर खान यांच्या घराजवळ बोरवेल मोटर बसवून नागरिकांना मोठा दिलासा!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): हिमायतनगर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील अख्तर खान यांच्या घराजवळील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
​ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरसेविका प्रतिनिधी रमेश पंडित यांनी पुढाकार घेतला आणि नगरध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्याकडे या समस्येचा सतत व आग्रही पाठपुरावा केला. रमेश पंडित यांच्या या प्रयत्नांची गांभीर्याने दखल घेत नगरध्यक्षांनी तात्काळ मंजुरी देऊन या ठिकाणी बोरवेलमध्ये मोटर बसवण्याचे काम पूर्ण केले.
​काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे यासाठी नगरसेविका प्रतिनिधी रमेश पंडित यांच्यासह , कुद्दूस, मौलाना, सत्तार मिस्त्री, युसूफ मिस्त्री, शेख लतीफ, पाशा मिस्त्री व शेख मुस्तफा यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी केली. ऐन गरजेच्या वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावल्याबद्दल प्रभागातील रहिवाशांनी नगरसेविका प्रतिनिधी रमेश पंडित आणि नगरध्यक्ष शेख रफिक यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button