ढाणकी येथील संस्थाचालक/डॉक्टरकडून रुग्णाला ‘जातीवाचक’ शिवीगाळ; बिटरगाव पोलिसांकडून ‘अर्ज चौकशी’ सुरू

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
ढाणकी येथील साई श्रद्धा हॉस्पिटल च्या डॉ. नरेश काशिनाथ गंधेवार यांनी उपचारासाठी आलेल्या रुग्णासोबत वाद घालून त्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. “तू हलक्या जातीचा व्यक्ती आहेस,” तुझी औकात काय आहे, तू मला सांगतो काय,असे बोलून डॉक्टराने अपमानित केल्याचे रुग्णाने म्हटले आहे. या प्रकारानंतर संतप्त रुग्णाने बिटरगाव पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची ‘अर्ज चौकशी’ सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढानकी येथील साई श्रद्धा दवाखान्यात उपचारासाठी वसंतराव खंडू नरवाडे रा .बिटरगाव बु. दिनांक 7 जून 2025 रोजी रुग्णालयात गेले असता रुग्णांनी आपले नाव वसंता नरवाडे असे सांगितले तेंव्हा डॉक्टर साहेब संतापले व मला थातूरमातूर तपासून द्वेष भावनेने महिलेच्या प्रसूतीगृहात घाणेरड्या खोलीमध्ये नेऊन वार्ड बॉय च्या हाताने माझ्यावर उपचार करण्यात आला. ही बाब मेडिकल व डॉक्टर साहेबांचे सर्व पैसे देऊन त्यांना सांगत होते की मला वेगळ्या जागी का उपचार केला तेव्हा डॉक्टर यांनी एकदम माझ्याशी अंगावर धावून आले व मनाले तू दोन कवडीचा पत्रकार आहेस. तुझी लायकी आहे का मला ज्ञान शिकवायला तू ‘माझ्या शाळेची बातमी का’ लावली?तू आत्ताच्या आत्ता माझ्या दवाखान्याच्या बाहेर निघ नाहीतर तुला गुंडे लावून जीवाशी मारून टाकेल व तू कुठून आलास कुठला आहेस कोणत्या जातीचा आहेस मला सर्व माहित आहे.तू कोणीही असशील मला काही फरक पडत नाही.कारण माझ्याकडे राजकीय पॉवर व रुपयाची कमतरता नाही. त्यामुळे तू माझ्या विरोधात कुठेही गेला. तर माझे काहीच वाकडे करू शकणार नाही.तुझ्यासारखे हलक्या जातीचे लोकं मी एरवीच गुंड लावून मारून टाकतो. असे म्हणत थापड बुक्या नि मारहाण करून क्याबीन च्या बाहेर हाकलून दिले. व तुला जीवाशी मारावे लागेल असे म्हणणे अर्जामध्ये नमूद करून डॉ.नरेश काशिनाथ गंधेवार यांनी अर्वाच भाषेत शिवीगाळ अपमानास्पद वागणूक दिली,. “तू हलक्या जातीचा व्यक्ती आहेस,” असे बोलून डॉक्टराने अपमानित केल्याचे रुग्णाने म्हटले आहे.
या प्रकारानंतर संतप्त रुग्णाने बिटरगाव पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली आहे. हरदडा येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल या शाळेचे अध्यक्ष डॉ. नरेश काशिनाथ गंदेवार आहेत अशी माहिती पुढे आली आहे शाळेच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्याबद्दल बऱ्याच पत्रांना मुचकट दाबी करण्यात येत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात वेग धरत आहे
पोलिसांकडून ‘अर्जाची चौकशी’ सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, सध्या या प्रकरणाची चौकशी’ सुरू केली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.. डॉ. नरेश गंदेवार यांच्यावर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन होईल अशी दाट शक्यता बौद्ध समाजातून चर्चेत येत आहे.



