Uncategorized

वाकान येथे उद्यापासुन १० दिवसीय तिज उत्सवास आरंभ!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

वाकान: गोर बंजारा संस्कृती नुसार नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावर आपआपल्या सोयीनुसार तिज उत्सवाला सुरुवात केली जाते.सततच १० दिवस चालणारा हा बंजारा समाजातील महिला भगिनींसाठी आनंदाचा उत्सव आहे.गावातील नायक, कारभारी, जेष्ठ नागरिक व समस्त गावकरी यांच्या आज्ञेचे पालन करुन या उत्सवाला सुरुवात केली जाते.पहिल्या दिवसी गावातील तरुणी गावातील नायक कारभारी यांचेकडे तिज उत्सव साजरा करण्यासाठी साकडे घालतात.व माळपठारावरील सुपीक माती आणुन बांबुपासुन बनलेल्या टोपलीत जेवारा पेरतात.आणी नित्यनेमाने नियमीत १० दिवस सकाळ संध्याकाळ तांड्यातील मुली पारंपरिक गीताचे गायन करुन जेवाऱ्यावर पाणी टाकतात.आणी पाचव्या दिवशी ढंबोळीचे कार्यक्रम सादर करुन आप आपल्या नातेवाइकांना निमंत्रण देऊन महत्वाचा दिवस मानुन श्री कृष्ण भगवंतास नैवेद्य अर्पण करून स्नेह भोजनाचा कार्यक्रम करतात त्यास ढंबोळी असे म्हणतात.व दहाव्या दिवशी आनंद उत्सव साजरा करून तिज मातेचे विसर्जन केले जातात .अपारंपारिक पद्धतीने गोर बंजारा समाजाचा तीज उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बंजारा वसाहत वाकान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे .या प्रसंगी तांडयाचे नायक सुरेश राठोड,नायक युवराज राठोड, कारभारी इंदल राठोड, कारभारी,भिमा पवार व तांड्यातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button