Uncategorized

गटविकास अधिकारी साहेब जाणीवपूर्वक बदनाम करून मानहानी करणाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करा

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड दिनांक २६ सप्टेंबर २०२४
रामदास इटकरे तालुका व्यवस्थापक (IBCB), माधुरी दळवी प्रभाग समन्वयक (मुळावा प्रभाग) यांनी २५ सप्टेंबर २०२४ रोजिच्या वर्तमानपत्रात आपली जाणीवपूर्वक बदनामी करून मानहानी केली त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत गटविकास अधिकारी उमरखेड यांना निवेदन दिले.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मानव विकास कार्यक्रम अंतर्गत पिंपळदरी येथून एकूण दोन समूहांनी जसा पुरवठा आदेश कंपनीला दिला तसाच शेळीचा पुरवठा करण्यात आला असतानाही व शेळी प्रकरणात आमचा कुठलाही हस्तक्षेप नसून ICRP यांचे पती तानाजी भिसे यांनी आमच्याकडे वारंवार संपर्क करून आम्हाला पैसे काढून द्या शेळी कधीही द्या तसेच आम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगितले की कट्टर करिता आलेला निधी मला द्या मी गटाचा सर्व खर्च केलेला आहे व पुरवठादार कंपनी यांना फोन करून तानाजी भिसे यांनी पैशाची मागणी केली परंतु सदरचा गैरप्रकार आम्ही होऊ दिला नाही त्याचप्रमाणे तानाजी भिसे यांनी महिलांची दिशाभूल करून महिलांच्या परस्पर पुरवठादारा सोबत आर्थिक व्यवहार केला आहे. तानाजी भिसे यांनी गावातील ज्या महिलांना फसविले आहे त्यांचे समोर आपले गोड बंगाल उघडकीस येऊ नये त्यामुळे आमच्यावर सर्व खोटे आरोप आमचे वर कार्यवाही व्हावी या उद्देशाने आम्ही महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली अशा प्रकारचे आमचे विरुद्ध षडयंत्र रचून आमची तक्रार करून वर्तमानपत्रात नावासहित बातमी प्रसिद्ध करून आमची बदनामी व मानहानी केली तरी माननीय गटविकास अधिकारी साहेब आपण चौकशी करून तानाजी भिसे यांच्यावर कार्यवाही असे आपल्या निवेदनातून रामदास इटकरे व माधुरी दळवी यांनी म्हटले आहे.

       चौकट

माझ्यावर जे आरोप केले ते खोटे असून सदर तक्रार कर्त्याने स्वतः आर्थिक व्यवहार करून महिलांची फसवणूक केली आहे मी याला विरोध केल्याने फक्त सूडबुद्धीने केलेले हे आरोप आहेत याचे पुरावे मी चौकशी च्या वेळी सादर करणार आहे माझ्या प्रभागात व तालुक्यात माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा तिसऱ्याच व्यक्तीचा हात आहे तेही लवकरच सिद्ध होईल
-माधुरी दळवी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button