ज्योती चिकणे ( गुद्दे ) यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार :

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
तालुक्यातील चिल्ली ज . जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पंचायत समिती उमरखेड येथील शिक्षिका ज्योती चिकणे ह्या मागील अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाने शिकवित असतात याच कार्याची दखल घेत दि 20 रोजी यवतमाळ येथील वसंतराव नाईक सभागृह येथे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिल्ली ज. पं.समिती उमरखेड येथे कार्यरत असलेल्या ज्योती मोतीराम चिकणे यांनी त्यांच्या सेवाकाळात विविध नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. बाला,झेप, शैक्षणिक सहल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती करून विद्यार्थ्यांना बोलके केले. या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यवतमाळ चे जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की , शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांचे उपस्थितीत पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांचे शुभहस्ते सन २०२२-२३ चा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यापूर्वी त्यांचा तालुका स्तरीय उपक्रमशील शिक्षिका म्हणून तत्कालीन शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांचे हस्ते गौरव करण्यात आला. या पुरस्काराचे श्रेय त्या गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे ,गटशिक्षणाधिकारी सतिष दर्शनवाड ,विस्तार अधिकारी.मिलिंद कांबळे ,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक तथा शाळेतील विद्यार्थ्यांना देतात.