Uncategorized

लोकप्रतिनिधीकडून लोअर पूस वेणी प्रकल्पातील गैरप्रकारांची चौकशीची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे महागाव तालुक्यातील वेणी येथील लोअर पूस प्रकल्पातील कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत आमदार Vijay Wadettiwar यांनी जलसंपदा विभागाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
मुख्य कालव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी संबंधित ठेकेदारास केवळ ९० दिवसांत सुमारे ४ कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत आमदारांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून, प्रत्यक्षात कामे निकृष्ट दर्जाची व अपूर्ण असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, १९९२ पासून कालव्याच्या सिमेंट लाइनिंग व दुरुस्तीबाबत वारंवार मागण्या व आंदोलने होऊनही पुरेसा निधी उपलब्ध झाला नव्हता. मात्र अलीकडे मोठ्या प्रमाणात निधी खर्च दाखवून कामे पूर्ण झाल्याचे दर्शविण्यात येत आहे. प्रत्यक्षात फक्त माती उपसा करणे व झाडे-झुडपे तोडणे इतक्याच मर्यादित कामांना पूर्ण कामाचे स्वरूप देण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, कालव्यात सिमेंट लाइनिंग न करता केवळ खोदकाम करून फॅनल भराव टाकण्यात येत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे ५० किमी अंतरातील काम अपूर्ण ठेवून ० ते १२ टेल भाग वगळल्याची बाबही पुढे आली आहे.
या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित पाणीपुरवठा सुरळीत होण्याऐवजी पुन्हा जुन्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासन यावर कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button