एजुफेलो हब (Edufellow Hub) तर्फे ऑनलाइन निबंध स्पर्धा 2026 चे आयोजन

सहसंपादक शेख मुजाहिद
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त Edufellow Hub (एजुफेलो हब) तर्फे “ऑनलाइन निबंध स्पर्धा 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय या विषयांवर आधारित ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात ऑनलाइन MCQ चाचणी घेतली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात हस्तलिखित निबंध स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹1000, द्वितीय क्रमांकासाठी ₹700 आणि तृतीय क्रमांकासाठी ₹500 तसेच प्रमाणपत्र व पुस्तके प्रदान केली जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी निबंधाचे विषय “सामाजिक बदलासाठी शिक्षणाचे महत्त्व” तसेच “समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय” असे असून, निबंधाची शब्दमर्यादा 1000 ते 1200 शब्द ठेवण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 5 एप्रिलपर्यंत आपले निबंध सादर करावेत. नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करून Google Form द्वारे अर्ज करता येणार असून, प्रवेश फी ₹20 निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विविध मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले असून, अधिक माहितीसाठी पंकज गारशेटवाड (मो. 8263955620) व शुभम गारशेटवाड (मो. 7709486388) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



