शहर

रात्री १ वाजताही ‘महावितरण’चा धडाका; हिमायतनगरच्या वीज योद्धांचा अहोरात्र रणसंग्राम!


​हिमायतनगर तालुका(प्रतिनिधी शेख खयुम):
मार्च महिन्याच्या भीषण उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, रात्रीच्या वेळी सुखाची झोप मिळावी हीच सर्वांची माफक अपेक्षा असते. अशा कडाक्याच्या उन्हात हिमायतनगर उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता, लाइनमन आणि तांत्रिक कर्मचारी खऱ्या अर्थाने जनतेसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत. जेव्हा संपूर्ण गाव निद्राधीन असते, तेव्हा मध्यरात्री १२:३० ते १:०० वाजेच्या सुमारास कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास, हे कर्मचारी कशाचीही तमा न बाळगता थेट जमिनीवर उतरून दुरुस्तीची कामे पूर्ण करत आहेत.
​वाढत्या उष्णतेमुळे विजेचा ताण वाढत असताना, “तालुक्यातील प्रत्येक घरात गारवा आणि प्रकाश असावा” या ध्येयाने हे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहेत. स्वतःच्या विश्रांतीचा त्याग करून ‘एनीटाइम’ सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचे संपूर्ण तालुक्यात मोठ्या अभिमानाने कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button