शहर

महावितरणचा ‘करंट’: अपंग पती अन् ६० वर्षीय माऊलीचा टाहो; संविधानाचा विसर पडलेल्या मुजोर अधिकाऱ्यांचा बुरखा फाडला!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
भारतीय संविधानाने गरिबाला अनुच्छेद २१ नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असताना, हिमायतनगर महावितरणने मात्र पारधीवाड्यातील कदम कुटुंबाला मरणाच्या दारात उभे केले आहे. विठ्ठल कोंडुबाराव कदम यांचे वीज मीटर ‘Faulty’ असतानाही, निर्दयी प्रशासनाने त्यांना ३३,८६० रुपयांचा अवाढव्य ‘शॉक’ दिला. घरात अपंग पती आणि अठराविश्व दारिद्र्य असताना ६० वर्षीय आनंदाबाई ८ दिवस कार्यालयात ढसाढसा रडून न्याय मागत होत्या. “आम्ही अडाणी आहोत, आम्हाला आधार नाही, म्हणून आमची अशी छळवणूक का? संविधानात गरिबांना अधिकार नाही का?” हा त्यांचा आर्त सवाल प्रशासकीय संवेदनाशून्यतेवर चपराक मारणारा आहे.


​हा अन्याय पाहून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वामन पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत वीज विभागाला धारेवर धरले. आंदोलनाचा इशारा मिळताच, ३३ हजारांचे बिल अवघ्या काही तासांत २,५०० रुपयांवर आले. गरिबांना अडाणी समजून त्यांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? संविधानाची थट्टा करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा हिशोब आता जनताच चुकता करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button