शहर

मतदार यादीत नाव टिकवण्यासाठी आता द्यावे लागणार १४ पुरावे; प्रशासनाकडून विशेष मोहिमेला सुरुवात


​हिमायतनगर तालुक ( प्रतिनिधी शेख खयुम):
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सध्या २०२४ मधील मतदार यादीचे २००२ च्या यादीशी मॅपिंग करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या मतदार यादीत आढळणार नाही, अशा नागरिकांना आपले नागरिकत्व आणि रहिवास सिद्ध करण्यासाठी आता १४ प्रकारचे पुरावे सादर करावे लागणार आहेत.
​प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जे मतदार आवश्यक पुरावे देऊ शकणार नाहीत, त्यांचे नाव मतदार यादीतून कमी केले जाण्याची शक्यता आहे. बीएलओ (BLO) मार्फत सध्या ऑनलाइन मॅपिंगचे काम सुरू असून, नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव जुन्या यादीत नसेल, तर खालीलपैकी पुरावे तयार ठेवावेत:
​२००२ पूर्वीची मतदार यादी किंवा जुनी पावती.
​जमीन/मालमत्तेची कागदपत्रे किंवा भाडेकरू असल्यास त्याच्या नोंदी.
​जन्म प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट.
​पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा बँक पासबुक.
​शासकीय निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र.
​पात्रतेसाठी अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात किमान १० वर्षे वास्तव्य असणे गरजेचे आहे. ज्या मतदारांशी संपर्क होऊनही ते पुरावे देणार नाहीत, त्यांना नोटीस देऊन त्यांचे नाव यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button