संविधान मानव अधिकारांची सनद डॉ .प्रा अनिल काळबांडे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :-स्वातंत्र्याची 75 वी ला आपण घर घर तिरंगा लावून राष्ट्रगीत गाऊन साजरी केली ही फार अभिमानाची गोष्ट आहे . माणसांना ज्या संविधानामुळे स्वातंत्र्य मिळालं त्या संविधानाची पण 75 वी पूर्ण झाली पण घरोघरी संविधान म्हणून साजरा करण्यात आला नाही याची खंत व्यक्त करत संविधानाचा जागर घरो घरी झाला असता तर इथल्या प्रत्येकाला त्याचे अधिकार जीवन जगण्याचा , व्यक्ती ची प्रतिष्ठेचा , धार्मिक दृष्ट्या उपासने चा धर्म आचरण प्रसार प्रचाराच्या अधिकारासह स्वातंत्रय , समता ,न्याय , बंधुता हा संविधानाचा गाभाही कळाला असता .
ते मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस या संघटने तर्फे राज्यव्यापी संविधान सर्वांनसाठी अभियाना अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवसा निमित्त अल हुदा शाळेत घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात बोलत होते .
या प्रसंगी मंचावर इनायत उल्ला जनाब , डॉ प्रा अनिल काळबांडे,ॲड यासीर खान , ॲड अरमान शेख , शाहरुख पठाण, कामरान खान आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
काळबांडे पुढे म्हणाले की ,वेगवेगळी संस्कृती खानपान ,प्रथा, परंपरा, सण, उत्सव ,वेशभूषा , राहणीमान, कपडे एवढ्या विविधतेने भरलेल्या देशाला एक संघ करण्याचे काम संविधानाने केले .भारतात राहणारे सर्व नागरिक भारताचे नागरिक आहेत त्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने दिल .हे संविधान संविधान गावात ,तांड्यात, वस्तीत राहणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे .
युवकांनी भावनिक होऊ नये .भावनिकतेचचे बरेचसे नुकसान आहेत .संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपले हक्क अधिकार घेण्याचे प्रयत्न करावे समाज बदनाम होईल असे कृत्य कोणीही करू नये . असे आवाहन काळबांडे यांनी केले .
यापुढे चालून लोकां चे अधिकार साबूत राहतील की नाही याबद्दल देशप्रेमींच्या मनात चिंता असल्याचे सांगत सध्या मशीन चमत्कार चालू असल्याचे सांगुन ते उलटण्यासाठी जागृत होणे गरजेचे असल्याचे सांगत .बांगलादेशी हिंदूवर होत असलेल्या अत्याचारा इतकी चिंता आपल्याला मणिपूर मधील आपले आदिवासी बंधू भगिनींवर होत असलेल्या अत्याचाराची पण वाटली . पाहिजे असेही ते म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक रसुल पटेल यांनी सुत्र संचालन फिरोज अन्सारी यांनी तर आभार प्रदर्शन साबीर नाईक यांनी केले.
सोबत कार्यक्रमाचे फोटो



