अवादा’च्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाने कंपनीचा शेतशिवारात धुमसणारा कारभार

महागाव प्रतिनिधी
अवादा कंपनीकडून सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर प्रवेश करून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अवादा कंपनीविरोधात आंदोलन छेडले असून प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कंपनीने शेतशिवारात विद्युत वाहिन्या टाकताना ना परवानगी घेतली ना नुकसानभरपाई दिली. उलट, जमिनीचे नुकसान होऊनही कंपनी जबाबदारी टाळत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शेतकरी म्हणतात की, अवादा कंपनीच्या कामकाजामुळे पिकांचे आणि जमिनीचे मोठे नुकसान होत असून, ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर वादाची परिस्थिती निर्माण झाली.
विद्युत विभागाच्या नियमबाह्य कामांवरही शंका उपस्थित करण्यात आली असून, संबंधित विभागानेही दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. कंपनीकडून सामाजिक जबाबदारीचे पालन होत नाही, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, कंपनीच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्याची तयारी सुरू असून, प्रशासनाने तातडीने तपासणी करावी व शेतकऱ्यांचे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात निवेदनाद्वारे करण्यातआली आहे.



