Uncategorized

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष एड सचिन नाईक यांची पत्रकार परिषद सुरू असताना प्रशासनाला आली जाग!

महागाव प्रतिनिधी संजीव नागरगोजे


महसूल प्रशासन व पोलिसांनी फुलसावंगी ( हिंगणी ) येथे अवैध रेती साठा 40 ब्रास केला जप्त
महागाव तालुक्यामध्ये अभय मस्के तहसीलदार आल्यापासून अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती त्यांचे साठे लोटे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जात आहे .तसेच महागाव पोलीस स्टेशनचे अवैध धंदे करणाऱ्यांना अभय असल्यामुळे कारवाई होत नव्हती त्यामुळे फुलसांगवी गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहीला नाही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले होते. चोऱ्या डकेती खुलेआम होत आहे .त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फुरसांगवी गावात राहणे कठीण झाले होते. चांगले नागरिक गाव सोडून पुसद उंबरखेड येथे राहायला गेले अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून गावातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला निवेदनाद्वारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे सीसीटीव्ही फुटेज लावून जनतेला संरक्षण द्यावे अवैध बंद करावे असे पत्र जिल्हा अधिकारी व पोलीस अधिकारी यांना दिले आहे. असे मत पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष एडवोकेट सचिन नाईक यांनी मांडले असून यापुढे अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात गावोगावी कमिट्या तयार करून जनजागृती करणार आहे. गावातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा देऊ सहकार्य केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये सर्व पुरावे देऊन आपल्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहे. प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी रेती वाहतूक करणारा टिप्पर दिनांक-9 -8 -2025 रोजी रात्री 11.30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केला व जबानी रिपोर्ट देऊन रेती वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला कलम 303(2) 3(5) नुसार गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्या वर पोलीस अधिकारी कारवाई करणार असल्याचे मत ठाणेदार यांनी आपली प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीला दिली असून लवकरच चोरीचा छडा लावून चोरांना अटक केली जाईल, अवैध धंदे पूर्णपणे बंद केले जातील, कोणाचीही हाय गई केली जाणार नाही ,सर्व बीड जमादारांना व पीएसआय यांना आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button