हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब व धर्मवीर आनंद दिघे यांचा वसा अंगीकारून कार्य करा ; मा आ.ज्ञानेश्वर धाने पाटील[शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था व प.स. जि.प.निवडणुक करीता शिवसेना एकनाथ शिंदे ची बैठक संपन्न ]

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था ( नगर परिषद) व तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आगामी होऊ घातलेल्या निवडणूकच्या दुष्टिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार जिल्ह्यात तयारी चालू केली आहे, पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली उमरखेड तालुक्यातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, बुथप्रमुख, सरपंच ईच्छुक उमेदवार मेळावा ( बैठक) स्थानिक राष्ट्रमाता जिजाऊ भवन उमरखेड येथे आयोजित करण्यात आला होती सदर बैठकीत यवतमाळ जिल्हा निरिक्षक माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर काका मोहड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार ‘ युवासेवा जिल्हाप्रमख विशाल गनत्रा ,महिला जिल्हाप्रमुख आशाताई मसाळ ‘सह संपर्कप्रमुख चितंगराव कदम सर यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी या बैठकीला विचार प्रगट केले निवडणुका कशा पद्धतीने जिंकायचा या बाबतीत मागदर्शन केले शिवसेना प्रमुख हृद्रय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार व यांचा वसा अंगीकारून कार्य केले त्यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हा उदांत हेतू उराशी बाळगून रंजल्या गांजल्याचे कष्टकरी शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे कार्य केले त्याच विचारानी उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.संजय राठोड यांचे कार्य घरा घरात पोहोचवावे व आगामी निवडणुका शिवसेना ताकतीने लढणार असल्याचे व्यक्त करण्यात आले शिवसेनेच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक विषयाला अनुसरून पाडाच कथन केला. बैठकीला ज्येष्ठ सैनिक अनिल नरवाडे , रविकांत रुडे माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम, तालुका प्रवीण पाटील मिराशे,संतोष जाधव , युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश कदम,तालुका संघटक कपिल चव्हाण,गजानन सोळंके,शहर प्रमुख अँड संजय जाधव,संजय सल्लेवार,महिला तालुकाप्रमुख आशाताई कलाने, सुनिता देशमुख, शहर महिला प्रमुख सपना चौधरी, शहरातील व तालुक्यातील विभाग प्रमुख उपशहर प्रमुख शाखाप्रमुख युवा सेना महिला आघाडी आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते,



