शेतीपिकाच्या नुकसानी सोबतच फळबाग , हळद , ऊस पिकांचेही सर्वे करा !

[माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटीची मागणी ]
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील खरीप पिके ढगफुटी सदृश्य पावसामुळे व पैनगंगा नदीला आलेल्या मुळे झालेल्या नुकसानीचे पिकाचे सरसकट शासकीय मदत द्यावी तसेच ऊस पिकाचा नुकसानीचा तसेच फळबाग नुकसानाचे अहवाल मागवून पाठवीण्याचे आवाहन आज २१ ऑगष्ट रोजी उमरखेड तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देवून केले आहे.
आज माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचे नेतृत्वात माजी जि .प . बांधकाम सभापती राम देवसरकर, तातू देशमुख , काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून
उमरखेड तालुक्यात 15 ते 19 ऑगस्ट अति अतिवृष्टी 157.5 मिली मिटर पाऊस झाल्यामुळे खरीप पिके व ऊस, केळी, हळद, इत्यादी पिकाला सरसगट शासकीय अनुदान हेक्टरी 50,000/- (अक्षरी पन्नास हजार रूपये) रूपये द्यावे ,
अतिअतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्यामुळे नुकसान भरपाई हेक्टरी 1,00,000/-(अक्षरी – एक लाख रूपये मिळण्याबाबत ,
अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे सरसगट कर्जमाफी देण्यात यावी
2024-25 हंगामातील प्रलंबित शासकीय मदत व पिकविमा त्वरीत मिळण्याबाबत ,कृषीपंपाची विद्युत बिले माफ करण्याबाबत, खरीप हंगामात सोयाबीन ऊस पिकाला हुमनी रोगाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे कृषी विभागाकडून पाहणी करून शासकीय मदत मिळण्याबाबत , अतिअतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्ते व पुल वाहून गेल्यामुळे त्वरीत दुरूस्ती करण्याबाबत.
यय उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाचे मागील उन्हाळ्यात पाणी पैनगंगा नदीत कमी सोडल्यामुळे 55 टक्के पाणी धरणात शिल्लक राहिले त्यामुळे खरीप हंगाम 2025 ला पैनगंगा नदीला महापुर आला तरी संबंधीत अधिकाऱ्यांना पाणी साठा जास्त ठेवल्यामुळे त्यांना तंबी देण्याबाबत.
उर्ध्वपैनगंगा प्रकल्प पाणीसाठा मागणी प्रमाणे पैनगंगा नदीच्या पात्रात सोडून प्रकल्पात 30 टक्क्यापेक्षा जास्त साठा ठेवण्यात येवू नये. व पैनगंगा नदी काठावरील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकण्यात यावी या आशयाचे निवेदन दिले असून यावेळी जिल्हाधिकारी यांचेसोबत चर्चा करतांना तालूका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने ऊस पिकाला अनुदान मिळत नसून या पुरात गेलेल्या ऊसाचा अहवाल बोलावुन शासनाकडे पाठवावा तसेच तालुक्यातील छोट्या पुलांची उंची वाढवून पुरपरिस्थिती नियंगणात आणावी अशि विनंती करून पोफाळी येथील जामकर नावाच्या शेतकऱ्याचे टोमॅटोचे अतोनात नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात फळबागाचे नुकसान झाले तसेच हळद ही पाण्यात गेल्याने ऊस , फळबाग व हळद पिकाच्या नुकसानीबाबत विशेषतः या जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी म्हणून अहवाल मागवून शेतकर्यांना अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील उमरखेड तालूका काँग्रेस कमीटीच्या वतीने करण्यात आले .
चौकट :
आज जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन उमरखेड तालुक्यातील पुरग्रस्त बाबत विविध मागण्या संदर्भात निवेदन दिले असून विशेषतः धरणातून पाणी सोडते वेळेस ९० टक्के धरण भरल्यावर सोडण्यात येते . त्यामुळे वरचा पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे या दोन्ही पाण्यामुळे गंभीर पुरस्थिती निर्माण होत असून हा पुर मानव निर्मित असल्याचे सांगून याबाबत धरणाच्या पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांना केली आहे .
माणिकराव ठाकरे –
माजी मंत्री महाराष्ट्र राज्य .
चौकट :
यावेळी माणिकराव ठाकरे यांनी पुरग्रस्तांच्या विविध मागण्या मांडल्या आहेत. जिल्हाधिकारी यांना उमरखेड तालूक्यात होणाऱ्या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाबाबत शासकिय अधिकारी (प्रमुख ) असल्याने लक्ष देवून या प्रकल्पात सुपीक जमीन जात असल्याने प्रकल्पाच्या मोबदल्यात त्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे लक्षात आणून देवून या प्रकल्पाला ४० गावातील शेतकर्यांचा विरोध असल्याचे सांगीतले .
राम देवसरकर
माजी जि.प . बांधकाम सभापती .
सोबत फोटो :
जिल्हाधिकारी यांना माणिकराव ठाकरे यांचे नेतृत्वात निवेदन देतांना.



