Uncategorized
लोही ग्रामपंचायतीकडून ‘लेक लाडकी’ योजनेतून वधू-वरास शाल, श्रीफळ व धनादेश प्रदान

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
नावीन्यपूर्ण लेक लाडकी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत लोहीतर्फे गृहकर नियमित भरणारे खातेदार श्री. मोहन श्रीराम दुधे यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त वधू-वरास सन्मानचिन्ह व आर्थिक मदत देण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच संजय रामभाऊ शिंदे, उपसरपंच राजू देवराव हळदे, ग्रामसेवक श्री. विद्याधर चौधरी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान वधू-वरास शाल, श्रीफळ आणि धनादेश सुपूर्त करून शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या ‘लेक लाडकी’ योजनेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.



