सातघरी ते माळवागत रस्त्याचे भूमिपूजनमोहिनी ताई इंद्रनील नाईक यांच्या शुभहस्ते कामाचे भूमिपूजन संपन्न झाले

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात सातघरी ते माळवागत रस्त्याचे काम महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेले रस्त्याचे भूमिपूजन मोहिनी ताई नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. जवळपास 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते व डाबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच मोहिनी ताई नाईक यांनी मतदारसंघांमध्ये सर्व विकासाची कामे घरोघरी नळ व बेघर असणाऱ्यांना घरकुल तसेच ग्रामीण भागातील मुलांना व्यायाम शाळा वाचनालय मागील त्यांना उपलब्ध करून देऊ .तसेच आदिवासी समाजासाठी सर्वांना घरकुल लाभ त्यांच्या योजनेतून देण्याचे व समाज कल्याण विभागातून रमाई आवास योजनेचा लाभ तात्काळ लाभार्थ्यांना दिले जाईल .ग्रामीण भागातील वृद्ध व्यक्तींना डोळ्याचे ऑपरेशनचे कॅम्प लावून गरजू लोकांना लाभ दिल्या जाईल असे मनोगत व्यक्त केले. त्यावेळेस माळवागत सरपंच इंदल राठोड, नामदेव राठोड ,अशोक जाधव, नरेंद्र जाधव, मोहन चव्हाण, रमेश राठोड ,सय्यद पटेल, निवास जाधव, दामोदर जाधव ,बळीराम काका, हेमराज जाधव, नामदेव राठोड, हंसराज मोरे, तसेच असंख्य कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्या देखरेखी खाली होत आहे.