Uncategorized

प्रहारचे बच्चू कडू यांना मोठा धक्का… अध्यक्षपदावरून अपात्र.! उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार..

मुख्य संपादक

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला असून, न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर विभागीय सहनिबंधकांनी त्यांना बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहकारी बँक राजकारणात खळबळ उडालीय.बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड आणि त्यांच्या गटाने बच्चू कडूंविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडूंना 2021 साली एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा सुनावल्याचा दाखला देत ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी या शिक्षेचा आधार घेत त्यांना नोटीस बजावली होती.2017 मध्ये नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडूंविरोधात शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना 2021 मध्ये एक वर्षाच्या शिक्षा सुनावली. या शिक्षेला कडूंनी नागपूर खंडपीठात आव्हान दिलं असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.या शिक्षेचा दाखला देत सहनिबंधकांनी त्यांच्यावर अध्यक्षपदासाठी अपात्रतेचा ठपका ठेवला आहे. यासंदर्भात बच्चू कडूंना आपले म्हणणे सादर करण्याची संधी देखील देण्यात आली होती. मात्र आता अंतिम निर्णय देत त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांचे समर्थक हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हणत असून, याविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार करत आहेत. आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!