ग्रामपंचायत माळवांगद मध्ये शाखा अभियंता उपअभियंता सरपंच सचिवाने 7, 03026 रुपयाचा केला भ्रष्टाचार गुन्हे दाखल होणार?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
चौकशी समिती प्रमुख तथा गटविकास अधिकारी उंबरखेड यांच्या चौकशी अहवालात उघड दिनांक 16 4 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे अहवाल दाखल झाला आहे.
चौकशी अहवालावर शासनाची वसुली व संबंधितावर फौजदारी कारवाई न केल्यामुळे तक्रार करता पृथ्वीराज प्रकाश चव्हाण दिनांक 10-6-2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले आहे.
महागाव तालुक्यात ग्रामपंचायत माळवागत मध्ये शासकीय निधीचा आर्थिक व्यवहार झाल्याबाबत चव्हाण यांनी तक्रार केली होती त्या त्या तक्रारीवरून दोन वेळा महागाव पंचायत समिती मार्फत चौकशी करण्यात आली त्या चौकशी अहवालात गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले त्यावरून तक्रारीची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दुसऱ्या तालुक्यातील अधिकारी यांची चौकशी समिती गठीत केली .त्या कमिटीमध्ये गटविकास अधिकारी उंबरखेड चौकशी प्रमुख तसेच शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उंबरखेड सदस्य व विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड सदस्य या कमिटीने ग्रामपंचायत माळवागद येथे जाऊन चौकशी केली असता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. त्यामध्ये 1)सरपंच सौ चंचल विनोद जाधव सचिव २) पी आर चांडे ३) श्री कुरकुरे सचिव ४)श्री आर बी पवार व सचिव ५) एस आर खाडे यांच्या कार्यकाळात 22- 2- 21 ते 29- 4 -23 पर्यंत (१) संत सेवालाल महाराज मंदिर येथे पेवर ब्लॉगचे बनावट व अंदाजपत्रक मोजमाप पुस्तक तयार करून शासनाचे निधी रक्कम १लाख 29 हजार 526 अपहार झाला .हे काम न करता शासनाचे निधीमध्ये अपहार केला त्या ठिकाणी कोणती काम आढळून आले नाही. मूल्यांक व काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र शाखा अभियंता व उपअभियंता यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून मोजमाप नोंदवही मध्ये नोंदवणे आवश्यक असताना त्यांनी तसे न करता मूल्यांक नोंदणी व काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिलेले असल्याचे ह्या कामावर झालेला खर्च शाखा अभियंता व उपअभियंता तसेच सरपंच सचिव हे जबाबदार असून त्यांच्याकडून समप्रमाणात रक्कम वसूल पात्र.
2) सन 2021- 22 च्या 15 वित्त आयोग निधी अंतर्गत दोन सिमेंट काँक्रेट रस्त्याचे मोजमाप पुस्तक व अंदाजपत्रक बनावट तयार करून शासकीय निधीचा अफार केला.तांत्रिक मंजुरात 16 -7- 21 प्राकलित रक्कम एक लाख वीस हजार तांत्रिक मंजुरात 15 -7- 21 प्रकलित रक्कम 1लाख 31 हजार 678 सिमेंट रस्ता दुरुस्ती सदरचे कामाचे स्थळ
दर्शन नकाशा , प्राकल नात नमूद केलेला नाही.सदर काम कोणत्या ठिकाणी झाले हे मोजमाप पुस्तके मध्ये नोंदविले आवश्यक असताना मोजमाप पुस्तके मध्ये नोंदविण्यात आल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे त्याला जबाबदार शाखा अभियंता उपअभियंता सचिव व सरपंच असल्याचे निर्देशनात आले तसेच सचिव यांनी दी- 28 -4 -22 रोजी धनादेश क्रमांक 95 66 87 नुसार 80 हजार रुपये रोखणे काढून सरपंच सचिवाने अफरातफर केल्याचे निर्देशनास आले. तसेच सरपंच व सरपंच व सचिवाने निविदा मॅनेज करून काम न करता 2 लाख 53 हजार 500 रुपयाची अनिमित्त झाल्याची आढळून आली चौकशी समितीला काही कामाचे दस्तावेत तपासणी करता उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्या कामाला सचिव व सरपंच जबाबदार आहेत .ग्रामपंचायतचे अभिलेख लिहिणे व जतन करणे ही जबाबदारी ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 62 (4 )नुसार सचिवाची जबाबदारी आहे. शासन परिपत्रक 2011/ प्र.क्र .१४२/ अस्था-९ दी-3 मे 2011 नुसार ग्रामपंचायतचा संपूर्ण प्रभार हस्तांतरित झाला किंवा नाही याबाबत विस्तार अधिकारी पंचायत समिती महागाव यांनी शहानिशा करणे आवश्यक होते परंतु तसे प्रभार हस्तारण्याचे प्रमाणपत्र चौकशीच्या वेळी आढळून आले नाही .त्याला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जबाबदार आहेत .त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणे बंधनकारक असल्याचे गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड चौकशी प्रमुख, व सदस्य जिल्हा परिषद बांधकाम विभाग उंबरखेड ,तसेच विस्तार अधिकारी सदस्य उंबरखेड सदस्य यांनी संयुक्तपणे आपल्या चौकशी अहवाला दिनांक 19 -3 -25 रोजी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे सादर केला .त्या चौकशी अहवाल मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले व शासनाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे ,असे नमूद असून ती कारवाई न झाल्यामुळे संबंधितावर कारवाई होण्याकरता तक्रारकर्ते चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर दिनांक 10- 6 -2025 रोजी अमरण उपोषण करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व शासनाचे रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे .असे निवेदन मुख्य कार्य अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना दिले आहे.