बौद्ध शमशान भूमीतील विविध मागण्या त्वरित पूर्ण करा – सिद्धार्थ दिवेकर (अध्यक्ष बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती)

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड (दि. 24 जानेवारी) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील बौध्द समाजाची एकमेव असलेली बौध्द स्मशानभुमीतील मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दिवेकर यांनी वेळोवेळी निवेदन देऊन ह्या मागणी पूर्ण झाल्या नाहीत.
मागण्या:-
बौद्ध स्मशानभुमीतील बैठक व्यवस्थेवर फरशी बसविणे, सरणजाळी बसविणे व एक सरणजाळी शेड उभारणी करणे, शेडच्या बाजूच्या मोकळ्या जागेत गार्डन बनविणे, 2 एल.ई.डी. हायमास्क लाईट बसविणे, संपूर्ण वॉल कंम्पाऊंडला रंगरंगोटी त्वरीत करणे, शेड समोरील जागेत चेकर्स बसविणे.
इत्यादी मागण्या अनेक वर्षापासून पूर्ण होत नाहीत. म्हणून मुख्याधिकारी साहेब आपण पुढाकार घेऊन वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात… अशा मागणीचे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी महेशकुमार जामनोर यांना दिले आहे.
यावेळी अर्जदार सिद्धार्थ दिवेकर, शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना), कैलास कदम (तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना,उमरखेड), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते) हे उपस्थित होते.