अतिक्रमणधारकांच्या जागा नावेकरून घरकुलाचा लाभ द्या

कैलासनगरवासीयांचे एसडीओंना निवेदन
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- मागील 25 वर्षापासून शासकिय जागेवर अतिक्रमण करून राहात असलेल्या कुटुंबांना मंजूर झालेल्या घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी नियमानुसार जागेचा दंड आकारून जागा नावे करावी व घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन कैलासनगर (बेलखेड ) येथील गरजु नागरिकांनी उमरखेड उपविभागिय अधिकाऱ्यांना दिले आहे.कैलासनगर बेलखेड येथे मागील 25 वर्षापासून 160 बेघर कुटुंबियांनी शासकिय जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी वास्तव्य करून राहात आहेत . सन 2014 – 15 मध्ये या
ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या काही अतिक्रमणधारकांना घरकुलाचा लाभ मिळून त्यांचे बांधकाम पूर्ण झाले. उर्वरित अतिक्रमण धारकांना नुकतेच शासनाकडून घरकुल मंजूर झालेले आहे . मात्र त्यांचे नावाने जागा नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने सदर अतिक्रमणधारक राहात असलेल्या जागेचा शासकिय नियमानुसार दंड आकारून त्यांच्या नावे जागा करून द्यावी व घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन माजी पं स सभापती प्रविण पाटील मिराशे, विनायकराव कदम यांच्या नेतृत्वात हरी राठोड, विठ्ठल राठोड, कृष्णा जाधव, बळीराम आडे, बेबीबाई राठोड, गणेश पवार, शेषराव राठोड, प्रल्हाद राठोड, तुकाराम राठोड, गणेश राठोड, लखन राठोड विजय राठोड आदिंनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिले आहे.