ऍडमिशन च्या नावाने पैसे उकळणाऱ्या त्या शाळांवर कार्यवाही करा ,( अन्यथा आझाद समाज पार्टी करणार आंदोलन)

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड प्रतिनिधी.
उमरखेड तालुक्यातील बहुतांश प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शासकीय व अनुदानित शाळांकडून प्रवेशासाठी पालकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याने अशा संबंधित शाळांवर तातडीने कारवाई करून पालकांची होणारे आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे दि 6 जून रोजी गटशिक्षणाधिकारी उमरखेड यांच्याकडे करण्यात आली,
उमरखेड तालुक्यातील उमरखेड, मुळवा ब्राह्मणगाव,व ढाणकी बिटरगाव परिसरातील शासकीय व अनुदानित शाळां व विद्यालयाचे संस्थाचालक व मुख्याध्यापक पालकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी शुल्काच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करीत आहेत, शाळा सौंदर्यकरणाचा बहाना व अन्य कारणे दाखवून पालकांच्या आर्थिक लूट करीत आहेत, शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत असताना या शाळांकडून बेकायदेशीर रित्या पालकांकडून पठाणी वसुली करण्यात येत आहे, प्रवेशासाठी शुल्काच्या नावावर पैसे मागणाऱ्या संबंधित शाळांवर व मुख्याध्यापक संस्थाचालकांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा आझाद समाज पार्टीच्या वतीने विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात धरणे देऊन डफली बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ऊर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंड, तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव, ढाणकी शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर, मार्शल विनोद बर्डे, राहुल धुळधुळे , समाधान राऊत, धम्मपाल गायकवाड, सुमित दवणे यांनी दिला