महागाव सार्वजनिक बांधकाम विभागाला नगरपंचायत वार्ड क्रमांक 2 मंजूर कामाची विसर!

प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत वार्ड क्रमांक 2 मध्ये माजी आमदार नामदेव ससाने यांनी त्यांच्या विष्ट पूर्ण योजनेतून सन 2023 -24 मध्ये सिमेंट काँक्रेट रोड शेखर मुळावकर ते निलेश आमीलकंटावार यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड कामाचे भूमिपूजन वाजत गाजत केले. त्यावेळेस नगरपंचायत वार्डाचे नगरसेविका यांचे पती दीपक आडे व इत नागरिक उपस्थित होते. त्या कामाला निधी 25 लाख माजी आमदार ससाने यांनी उपलब्ध करून दिला होता.त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर जमीरुद्दीन खलीलुद्दीन नवाब फुलसांगी यांचे टेंडर मंजूर करून कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली. परंतु त्या कामाची विसर पडलेली दिसत आहे. काम न करता कामाचा पैसा परस्पर कसे हडप करता यावा असे नियोजन होत असल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम अभियंता महागाव यांना या कामाची विसर पडली आहे. आजपर्यंत सिमेंट रोड करण्यात आला नाही त्यामुळे ठेकेदार यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून सिमेंट रोड करून द्यावा अशी मागणी वार्डमधील नागरिक अमीलकंटावार यांनी केली आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या कामाची विसर पडली असून कामाची मुदत संपली आहे .
सार्वजनिक बांधकाम अभियंता वार्ड क्रमांक 2 मधील सिमेंट रस्त्याचे काम मार्गी लावतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे . तसेच माजी आमदार नामदेव ससाने यांनी या कामाचा पाठपुरावा करावा अशी मागणी वॉर्ड मधील नागरिक करीत आहे .