Uncategorized

पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करा आर्णी प्रेसक्लबची मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मांगनी

मुख्य संपादक मो.9021233696

आर्णी प्रिंट माध्यम प्रतिनिधीच्या घरी पोलीस ताफ्यासह जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करून कुटुंबामध्ये दहशतत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांचे विरुद्ध कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन आर्णी प्रेसक्लब संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आर्णी तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले आहे.

शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत अवैध धंद्यांच्या अफाट वरकमाईमुळे मस्तावलेल्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी यवतमाळ येथील प्रिंट माध्यम प्रतिनिधी सतीश येटरे यांच्या घरी शासकीय वाहनाने ताफ्यासह जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली व कुटुंबीयांना जीवाने मारण्याची धमकी दिली.

गुंडागर्दीचे प्रदर्शन करीत शासनाने दिलेल्या अधिकार पदाचा गैरवापर केला. त्यांचे व त्यांचे समवेत गेलेल्या सर्व संबंधित पोलीसांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल अशा आशयाचे निवेदन आर्णी तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी आर्णी प्रेसक्लबचे अध्यक्ष आरिफ शेख, उपाध्यक्ष करण शेलकर, सचिव चिंतामण चहांदे, सहसचिव जफर पठाण, गणेश हिरोळे, राम पवार, जाफर शेख, नौशाद अली, अनिकेत खारोळ, प्रशिक मुनेश्वर, इम्रान बेग, ईरफान रजा, सचिन चहांदे, आसिफ शेख, राम होले, दुर्गेश कर्णेवार, प्रफुल जाधव, रमेश राठोड आदी प्रेसक्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!