शहरातील पोलीस वसाहतीच्या शौच्छालयाच्या सेप्टीक टँकच्या दुर्गंधीयुक्त वायुमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात

माजी नगराध्यक्ष राजुभैय्या जयस्वाल व माजी आरोग्य सभापती संदिप ठाकरे यांचे निवासस्थान याच भागात शिवसेनेचा पुढाकार
प्रदुषणाचा बंदोबस्त करण्यासाठी नप मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस वसाहती मधील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी , वसाहती मागच्या नागरी वस्तीलगत सदर सेप्टीक टँक तयार केलला आहे मागील अनेक दिवसांपासून सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सकाळ व सायंकाळी अतिशय दुर्गाधीयुक्त वायु बाहेर पडत असल्यामुळे , मागच्या वार्डातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले असून , अनेकांना श्वासोश्वास घेण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे त्यांचे ऑक्सीजन लेवल खालावत आहे डासांची उत्पत्ती होत आहे याबाबींच्या वेळोवेळी तक्रारी करूनही दखल घेण्यात आली नाही . निवेदनाची तात्काळ दखल घेऊन , होणारा त्रास लवकर थांबवावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन महिला शहर प्रमुख बालाजी चौधरी , सिमा संदिप ठाकरे , मिथिलेष जयस्वाल , संतोष निल्लावार , दत्तात्रेय गवळे , राहुल महामुने , कान्होपात्रा चौधरी , लताबाई चौधरी , डिन . एन . बाबरे , स्वाती निल्लावार आदि नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे कडे दिले