Uncategorized

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थीना प्रशिक्षणआँन जाँब ट्रेनिंग अंतर्गत प्रशिक्षण

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192


औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय. टी. आय यवतमाळ येथील प्रथम वर्षातील विजतंत्री इलेक्ट्रिक विद्यार्थीना ऑन जाँब ट्रेनिंग अंतर्गत 150 तास इलेक्ट्रिशयचे ट्रेनिंग तुमसरे इलेक्ट्रिकल वडगांव रोड यांनी दिले.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय टी आय इलेक्ट्रिशन विजतंत्री प्रथम वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आँन जाँब ट्रेनिंग अंतर्गत एकुण 35(पसत्तीस) विद्यार्थ्यांना दि. 02/06/2025 ते 24/06/2025 पर्यंत 150 तास प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहण्याची संधी यामुळे मिळणार आहे.सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य राहणारे तुमसरे इलेक्ट्रिकलचे,व संकल्प फाउंडेशनचे शहर प्रसिद्धी प्रमुख सागर महादेवराव तुमसरे या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य श्री.व्ही. जे.नागोरे सर व

शिल्पनिदेशक श्री. जी. पी. ठोबंरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू असून प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार आहे.तुमसरे इलेक्ट्रिकल च्या पाठपुराव्यामुळे हे प्रशिक्षण देणे शक्य होत आहे,अशी प्रतिक्रिया तुमसरे इलेक्ट्रिकचे सागर महादेवराव तुमसरे यांनी दिली यावेळी विशाल अतकरी, पंडीत बाबळे, दर्शन शेंडे,रुशिकेश येवले इत्यादी उपस्थित होते आणि प्रशिक्षणासाठी आलेले एकुण पसत्तीस विद्यार्थी यावेळी प्रशिक्षण घेत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!