Uncategorized

सवना ते वाकोडी रस्त्याचे काम अपूर्ण!बांधकाम विभाग लक्ष देणार का?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


सवना ते वाकोडी या रस्त्याच्या कामासाठी अंदाज पत्रका नुसार ४ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम ७ टक्के बिलो असून संबंधित कंतकदाराने दोघांमध्ये काम घेतले आहे. वर्षभरापूर्वी या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे .हा रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे अर्धवट कामाने वाहतुकीला अडथळा ठरत आहे.त्यामुळे मोटर सायकलचे अपघात होत.आहे वाकोडी ते सवना विद्यार्थ्यांना रस्त्याने जाताना नाहक त्रास होत आहे. सवना येथे ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे डिलिव्हरी पेशंटला रस्त्याने येताना उचलून आणावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव अंतर्गत या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे .वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्यामुळे कोट्यावधीचे रुपयाचे काम अर्धवट आहे .ठराविक वेळात काम होत नसल्यामुळे अर्धवट कामाचा नागरिकांना ना हा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशा अर्धवट कामाची पाहणी करून संमतीला जाब विचारत नसल्यामुळे कामाला वेग येत नाही. त्यामध्ये अधिकाराचे संगणमत दिसून येते .सवना -वाकोडे रस्त्याची ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. तो भाग वगळून नको त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे. अजूनही वाहतुकी योग्य रस्ता नसल्यामुळे मध्यंतरी सर्व शिक्षा अभियान मुली करता मोफत असलेले एसटी बस बंद करावी लागली होती .सवना येथे कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाकोडी येथे भरपूर आहे.
#( संबंधित कटकदारांनी काम अर्धवट का सोडले याची चौकशी करून प्रसंगी दंड आकारण्यात येईल किती काम झाले किती रक्कम अदा करण्यात आली त्याची चौकशी करण्यात येईल इतर 28 कोटीच्या प्रलंबित कामाची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई निश्चित केली जाईल. ) #
@ महेश मातुरकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद. @

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!