Uncategorized

राष्ट्रीय युवा पत्रकार संघटनेच्या महागांव अध्यक्ष पदी नागरगोजे तर उपाध्यक्ष म्हणून महामुनें यांची निवड!

(महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव येथील विश्रांती गृहावर आज दि. 2 जून रोजी युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. या वेळी
युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून नवभारतचे तालुका प्रतिनिधी विश्वनाथ महामुने यांच्या नावाला सर्वांनी एकमताने मंजूरी दिल्याने निवड प्रक्रिया पार पडली.
दैनिक मतदारचे महागांव तालुका प्रतिनिधी संजय पाटे यांनी यावेळी विचार व्यक्त करताना संघटन कसे असावे याबाबत विस्तृत माहिती दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय नागरगोजे यांनी सर्वप्रथम आपल्या निवडीबद्दल सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद दिले. संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्यावर आल्याने सर्व पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी जाणून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे काम करीत असतांना निर्भयपणे कुठलाही संकोच न बाळगता पत्रकारिता केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सतत बातम्याचा भडीमार करत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे, असे विश्वनाथ महामुने नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांनी आव्हान केले. पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता केली पाहिजे, वृत्तांकन करीत असतांना माफीयांच्या धमकीला भीक न घालता, कोणीही न डगमगता धैर्याने त्याला प्रत्युत्तर देता येईल संघटना आपल्या सोबत खंबीरपणे असणार आहे असे संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. अध्यक्ष उपाध्यक्ष
निवडी प्रसंगी संघनेचे विभागीय अध्यक्ष तथा महागाव वार्ताचे संपादक विजय सूर्यवंशी, दैनिक मतदारचे तालुका प्रतिनिधी संजय पाटे, दैनिक पब्लिक पोस्ट तालुका प्रतिनिधी रजत कुमार खाडे, पत्रकार शेर खान पठाण तसेच पत्रकार श्रीकांत राऊत यांची‌ या वेळी उपस्थिती होती.

(बॉक्स)

युवा ग्रामीण पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी येत्या आठ दिवसात संपूर्ण महागाव तालुका कार्यकारणी घोषित करण्यात येईल. महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांचा यामध्ये समावेश असणार आहे.

विजय सूर्यवंशी,
विभागीय अध्यक्ष, युवा ग्रामीण संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!