लोवर पुस वेणी धरण जलपर्णी च्या नावावर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार!

,
प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात लोवरपूस वेणी धरण असून त्याचे कार्यालय पाटबंधारे उपविभाग क्रमांक 4 महागाव येथे आहे .सहायक अभियंता म्हणून निशांत लहाने हे असून उपअभियंता वर्षानुवर्ष कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता म्हणून महागाव कार्यालयात कारभार पाहिला आहे. आता प्रमोशन झाल्याने पुसद उपविभाग कार्यालयात असलेले अविनाश भगत यांच्याकडे महागाव पाटबंधारे उपविभाग यांचा चार्ज आहे . वेणी धरणला दहा गेट असून त्या गेटमधून नदीला पाणी सोडण्याचा उपयोग केला जातो. त्या गेटमध्ये लाकडाचे मोठे खोड ,कचरा ,शेवाळ, अडकल्यामुळे उन्हाळ्यात जनावरासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडणे साठी गेट उघडत नव्हते. याचा फायदा अविनाश भगत व निशांत लहाने यांनी घेतला आहे .गेट मधील कचरा काढण्यासाठी एक शकल लढून जलपर्णी कामाचे कोटेशन तयार केले. 1 कोटी 50 लाख रुपयाचे व त्याचा ठेका आंध्रा मधील टी 10 जेसीपी मालका संघ बसून कॉन्टॅक्ट दिला .त्या टेंडरला मंजुरी मिळण्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्यासंग संगमत करून आव्हाडव्या इस्टिमेट तयार करून पाठवले व त्या कामाची मंजुरात घेतली वास्तविक मशीनच्या सहाय्याने एक गेटचा कचरा काढायला जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये तर दहा गेटला पाच लाख रुपये खर्च येत असताना अविनाश भगत व निशांत लहाने यांनी शासनाच्या तिजोरीमध्ये डल्ला मारण्याचे उद्दिष्टाने आव्हाडधव्य कोटेशन तयार केले त्यामध्ये १ कोटी 45 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे.कोणतेही वाजा गजा न करता कामाची जाहिरात न देता कागदोपत्री टेंडर मंजूर केले .व एका दिवसात टी 10 जेसीपी च्या साह्याने करून जलपर्णी चे काम पूर्ण झाल्याचे
दाखवून बिल काढण्याकरता कार्यकारी अभियंता मार्फत वरिष्ठांकडे पाठवले त्यामध्ये सर्वांचे पर्सेंटेज ठरलेले आहे .अशी तक्रार महागाव येथील अनंत नागरगोजे आरटीआय कार्यकर्ता व विजय सूर्यवंशी महागाव वार्ताचे संपादक संपादक तसेच संजय पाटे दैनिक मतदार तालुका प्रतिनिधी यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यामध्ये जलपर्णी च्या कामाचे बिल न काढता कामाची चौकशी करावी व भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी लेखी तक्रार मुख्यमंत्री व पाटबंधारे विभाग वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे.