Uncategorized

राज्य महामार्गावर कर्नाटकच्या पर्यटकांचे वाहन जळून खाक

!

शेख मुजाहिद ससंपादक मो.779830619

महागाव उमरखेड रोड वरील चिल्ली गावाजवळ आज दुपारच्या दरम्यान नागपूर तुळजापूर हायवे 361 वर कर्नाटक येथील पर्यटकांची गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली. उमरखेड येथील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते चितांगराव कदम सर यांनी पर्यटकांची गाडी विझविण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण केले होते. अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत आगीने भीषण रौद्ररूप धारण केल्याने अखेर कर्नाटक पर्यटकांची गाडी जाग्यावर जळून खाक झाली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी आणि झाली नाही. पोलिसांनी नुकसान ग्रस्त वाहनाचा पंचनामा केला आहे. वाढत्या तापमानाचा हा उद्रेक असल्याची संभावना व्यक्त होत आहे. महामार्ग हा सिमेंटचा असल्याने सिमेंट रोडवर उन्हाळ्यात वाहनाचे टायर प्रचंड प्रमाणात गरम होतात. त्यामुळे वाहनांच्या इंजनचे तापमान सुद्धा वाढत जाते. परिणामी अशा प्रकारचे महामार्गावर वाहनास आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात वाहनधारकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!