मुळावा रेती चोरांचा गुंडाराज वाळूचे दोन टिप्पर ८ ट्रॅक्टर, २६ बैलगाड्या दररोज सुरु

रेतीचोरावर दुसऱ्या मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाही स्थानिक मंडळ अधिकारी तलाठ्याचे हाप्ते सुरु असल्याची जोरदार चर्चा, रेतीमाफीयांचा कर्दनकाळ मंडळ अधिकारी सुरोशे यांना सरंक्षण तर तलाठी सानप यांच्या बदलीची मागणी
मुख्य संपादक
उमरखेड : संबंधित प्रशासनाच्या कृपेने मुळावा परिसरात पैनगंगेतून मोठ्या प्रमाणात रेती चोरीचा गोरखधंदा अनेक वाहन व बैलगाड्याने मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
या रेती माफियांनी अवैध धंद्यातून कमावलेला काळ्या पैशाचा दुरुपयोग करीत, अप्पू गांजा चरस व मध्य प्राशन करून, मागील दोन महिन्यापासून परिसरात धुमाकूळ घातला आहे, जो कोणी त्यांच्या अवैध रेतीबाबत तक्रार करेल किंवा त्यांना जाब विचारेल, अशा अनेक सामान्य नागरिकांना मारहाण करून, जीवानी मारण्याच्या धमक्या दिल्या, गेल्या. महिन्याभरात ७ते ८ जनावर याच रेतीमाफीयांनी हल्ले केले, काहींनी तक्रारी दिल्या तर काहींनी भीतीपोटी काहीच केले नाही. त्यांच्यावर पोलिसांचा वरदहस्त असल्याने सामान्य नागरिक सुद्धा या भुरट्या रेती चोरांना भीत आहे. मुळावा मंडळ अधिकारी व साज्या चे तलाठी सानाप व संबंधित पोलीस स्टेशन पोफाळीचे कर्मचारी यांचे साटे लोटे असल्यामुळे रेती तस्करांची हिम्मत वाढतच चालली व भुरट्या डॉन च्या संख्येत वाढ झाली आहे. रेती चोरांचे मुसक्या अवढण्यासाठी दुसऱ्या मंडळाचे अधिकारी गजानन सुरोशे येऊन मुळावा परिसरात कारवाई करतात त्यांचे फोन ठाणेदार उचलत नसल्याने तहसीलदारांना टेंशनला कॉल करावे लागतो व पोलिसही उशिरा पोहचल्याने काहीकाळ या रेती माफियाकडून मंडळाधिकाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होतो या वेळी मुळावा मंडळ अधिकारी, साज्या चे तलाठी गाढ झोपयेत असतात. गेल्या आठवड्यात आपल्या साज्यात अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर पकडले व कारवाई करण्यात आली, याची साधी भनक मंडळ अधिकारी व साज्यातील तलाठ्याला लागत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.
उमरखेड महागाव सह रेतीमाफीयांच्या मुस्क्या आवळून वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालणाऱ्या एका प्रामाणिक निष्ठावंत आणि इमानदार मंडळ अधिकारी गजानन सुरोशे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अप्पू गांजा दारू चे प्राशन करून रोज रात्री महसूल ची चोरी करणारे चोरटे यांच्याकडून मंडळ अधिकारी सुरोशे यांच्या जिवित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळवलेली आहे, अशा इमानदार अधिकाऱ्याला शासनाने संरक्षण देणे काळाची गरज आहे तसेच रेतीचोरांशी जवळीक असल्याने तलाठी पंजाब सानप यांची बदली करावी अशी निसर्ग प्रेमी व सामान्य जनतेतून मागणी होताना दिसत आहे.