कोरटा येथे शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी शिबिर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड ;- शासकीय माध्यमिक आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळा कोरटा येथे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी शिबिर व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका योजनेचा लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार आर. यु. सुरडकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, रेशनकार्ड लिपिक कैलास ग्यारल उपस्थित होते. यावेळी पुरवठा विभाग तहसिल कार्यालय उमरखेड तर्फे पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पार पाडण्यात आली. या शिबिरात बंदी भागातील एकूण ८ गावांचे नागरिक, लाभार्थी सहभागी झाले होते.
याशिबिरामध्ये शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, कमी करणे तसेच नवीन शिधापत्रिकाबाबत अर्ज, एपीएल शेतकरी यांचे थेट रोख हस्तांतरण डीबीटी अर्ज इत्यादी कामे तात्काळ निकाली काढण्यात आली.